Labels

माझा परिचय माझी कविता मोडी दफ्तर शिवछत्रपती महाराज श्रीमंत पेशवाई संकीर्ण लेखसंग्रह

शिवचरित्राचा प्राथमिक अभ्यास कसा करावा


          शिवचरित्राचा अभ्यास करताना आपल्याला अनेक गोष्टींचा सारासार विचार करावा लागतो. पैकी, शिवचरित्रातील अनेक पैलू, तत्कालिन समाजव्यवस्था, तत्कालीन राजकीय व्यवस्था, तत्कालीन लष्करी व्यवस्था इत्यादी अनेक. पण या झाल्या दुय्यम बाबी. प्रथम समजून घ्यावे लागते ते तत्कालीन उपलब्ध असणारे अस्सल पुरावे.
आज शिवाजी महाराजांची म्हणावी अशी अस्सल पत्र केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहेत. म्हणजे, तशी पत्रसंख्या पाऊणशे ते शंभरच्या घरात आहे, परंतू त्यातीला काही पत्रं ही संशयातीत आहेत, काही पत्र ही बनावट असल्याचं उघड झालं आहे तर काही पत्रं ही अस्सल पत्रांच्या नकला आहेत. काही काळापूर्वी ज्येष्ठ अन्‌ श्रेष्ठ इतिहास संशोधक मा. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून सर्वांत प्रथम जेव्हा एक कटू सत्य समजलं तेव्हा तर अक्षरशः अत्यंत लाज वाटली.. स्वतःचीच अन्‌ हा ठेवा नष्ट करणार्‍या महाभागांची ! बाबासाहेब म्हणाले, आपल्याकडे पूर्वीपासूनच अशी अस्सल पत्रं, करीने, शकावल्या इत्यादी साधने आहेत, पण काळाच्या ओघात ती नष्ट होत आहेत. पण सगळ्यात शरमेची अन्‌ खेदाची गोष्ट अशी की पुराभिलेखागारात असणार्‍या कागदपत्रांची सरकारी अधिकार्‍यांकडून अजिबात काळजी घेतली जात नाही आणि ज्याघराण्यात अशी कागदपत्रे उपलब्ध आहेत ती लोकंएखादा कागद संशोधकाला दिला आणि त्या कागदात आपल्या घराण्यातील पूर्वीची भाऊबंदकी लोकांसमोर उघड झाली तर अब्रुची लक्तरं वेशीवर टांगली जातीलअसल्या खुळचट भीतिला घाबरून संग्रहातीला कागद लोकांसमोर येण्यास मदत करत नाहीत ”. पूर्वी गडागडांवर दफ्तरं असत. परंतू महाराजांच्या मृत्यूनंतर भोसले घराण्यात गादीसाठी जी निरर्थक राजकारणं झाली किंबहूना, छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर महाराष्ट्राची जी वाताहात झाली, त्यात औरंगजेबी फौजांनी हे दफ्तरखाने जाळून टाकले. औरंगजेब हा तर बोलूनचालून परकीयच.. शत्रूच तो ! तो महाराजांच्या आठवणी अशा कशा मागे सोडेल ? पण तरीही, त्याच्या फौजांनी बर्‍याच दफ्तरखान्यांची विल्हेवाट लावून देखील कित्येक कागद गडागडांवर दफ्तरखान्यांत तसेच पडून होते. मग हे असंख्य दफ्तरकाने आज काय झाले, त्यातले ते हजारो कागद आज कुठे आहेत ? या प्रश्नाचं उत्तर माहित आहे ? गडावर जाणार्‍या ट्रेकर्स मंडळींनी, रात्रीच्या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याकरीता अक्षरशः शेकोटी पेटवून जाळून टाकले. काय म्हणावं याला ? ही आपली इतिहासाबद्दलची अनास्था ! हसावं का रडावं ते आपणच ठरवा... आणि शेवटी हसून किंवा रडून झाल्यानंतर, आतातरी, उरलेल्या या महान राजाच्या आठवणींचं कश्या प्रकारे जतन करायचं हे सुद्धा ठरवा. अजून काही बोलायची खरंच गरज आहे का ? आपण सर्व सुज्ञ आहातच, सर्व जाणताच... विचार व्हावा !
Newer Post Older Post Home

"पेशवाई" आणि "इतिहासाच्या पाऊलखुणा"च्या प्रकाशनानिमीत्त बनवलेले 'मराठी अभिमान गीत'..