शाहू छत्रपतींच्या मृत्यूनंंतर दि. ८ मे १७५० रोजी अमृतराव शंकर दिनकरराव यांच्या पत्रात नानासाहेबांनी त्यांना लिहीलेल्या पत्रातील मजकूर उधृत केला आहे. छत्रपती स्वामींविषयी नानासाहेबांना काय वाटत होते हे पुढील अस्सल पत्रातील मजकूर पाहून लक्षात येते.
यानंतर, पत्रलेखक "नानासाहेब आणि शाहू महाराजांंच्यातील परस्पर स्नेहाचा उल्लेख करतो तो असा-
लेखक म्हणतो की स्वामींनी म्हणजे पेशव्यांनी राजश्री स्वामींच्या मनाप्रमाणे सगळं केलं. राज्याचा बंदोबस्तही उत्तम केला. मित्रांना आनंद झाला आणि शत्रूंना खेद वाटू लागला. नानासाहेबांच्याया स्वामीभक्तीचे हे अगदी समकालीन वर्णन आहे.
पत्राचा स्रोत : "ताराबाईकालीन कागदपत्रे खंड ३, लेखांक १" (संपादक : अप्पासाहेब पवार)
पत्राचा स्रोत : "ताराबाईकालीन कागदपत्रे खंड ३, लेखांक १" (संपादक : अप्पासाहेब पवार)
© कौस्तुभ कस्तुरे । [email protected]