Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

पद्मभूषण रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई

१९३८ साली प्रकाशित झालेल्या “सरदेसाई स्मारक ग्रंथा”च्या अखेरीस रियासतकारांचे महत्व अधोरेखित करताना, श्री. रा. टिकेकर म्हणतात -

ग्रँट डफच्या इतिहासाशिवाय मराठ्यांचा समग्र इतिहास लिहीलेला नव्हता, अशा काळात रियासतकारांनी मराठ्यांचा इतिहास रियासतींच्या रुपाने वाचकांस उपलब्ध करून दिला. त्याची गुजराती, हिंदी, कानडी भाषांतरेही झालेली आहेत. त्यांच्याशिवाय दुसरा मराठी इतिहासकआर अद्यापी पुढे आलेला नाही. त्यांच्या ग्रंथावाचून ऐतिहासिक अभ्यासास दुसरे साधनच नाही, ही गोष्ट त्यांच्या मूठभर विरोधकांनाही नाकबूल करता येत नाही. शिवजन्मतिथीच्या वादात त्यांनी नवा पक्ष स्विकारला नसेल, शास्त्रशुद्ध संशोधन म्हणतात त्यात ते (विरोधकांच्या दृष्टीने) अनभिज्ञ असतील, त्यांच्या इतिहासात (कादंबरीसारखा) मीठमसाला नसल्याने तो खमंग लागत नसावा, लिहिण्याची पद्धत रुक्ष असल्याने त्याचे वाचन कंटाळवाणे होत असेल, मराठी भावनांचे आकलन नसलेल्या सर जदुनाथांसारख्या बंगाली विद्वानाग्रणींशी त्यांची जानी दोस्ती असेल, भारत इतिहास संशोधक मंडळातील मंडळींशी ते फटकून वागले असतील, आणखी देखील असेच त्यांनी सत्यासत्य अनेक “गुन्हे” केले असे मानले, तरिसुद्धा त्यांचे एकंदर कार्यच इतके श्रेष्ठ आहे की, त्यांची योग्यता कशानेही कमी होणार नाही ! भावी पिढ्यांना व अभ्यासकांना रियासतकारांचे हे ऐतिहासिक ऋण मान्य करावेच लागेल.१) इंग्लंड देशाचा विस्तार (Seelay कृत Expansion of England चे भाषांतर) - (१८९३)
२) उताणा रुपया (१८९५), ब्रिज (१८९५), व्हां तेयं (१८९६), संकेत (१८९६), चेंडू फळी (१८९६), चक्कर नावाचा खेळ (१८९६) ही सर्व खेळांसंबंधी संक्षिप्त माहितीपर पुस्तके
३) मुसलमानी रियासत – हिंदुस्थानचा अर्वाचिन इतिहास – (१८९९)
४) शालोपयोगी भारतवर्ष – (१९००)
५) मराठी रियासत, पूर्वार्ध, १७०७ पर्यंत – (१९०२)
६) शालोपयोगी भारतवर्ष, द्वितिय आवृत्ती – (१९०८)
७) ब्रिटिश रियासत, पूर्वार्ध, १७०७ ते १७२७ पर्यंत – (१९०८)
८) ग्रीस देशाचा इतिहास – (१९०८)
९) मुसलमानी रियासत – सुधारून वाढविलेली नवी आवृत्ती – (१९१०)
१०) बालोपयोगी महाराष्ट्राचा इतिहास – (१९१०)
११) मराठी रियासत, पूर्वार्ध सुधारून वाढवलेली नवी आवृत्ती – (१९१५)
१२) मराठी रियासत, मध्यविभाग १, १७०७ ते १७४० – (१९१७)
१३) मराठी रियासत, मध्यविभाग २, १७४० ते १७५० – (१९२१)
१४) मराठी रियासत, मध्यविभाग ३, १७५० ते १७६१ – (१९२२)
१५) महाराष्ट्राच्या इतिहासाच्या सोप्या गोष्टी – (१९२३)
१६) ब्रिटिश रियासत, पूर्वार्ध, द्वितियावृत्ती – (१९२३)
१७) मराठी रियासत, मध्यविभाग १, द्वितियावृत्ती – (१९२५)
१८) मराठी रियासत, मध्यविभाग ४, १७६१ ते १७७४ – (१९२५)
१९) Main currents of Maratha History, Patna university lectures – (१९२५)
२०) सरदेसाई घराण्याचा इतिहास, पूर्वार्ध भाग १ व २ – (१९२५)
२१) नानासाहेब पेशवे – (१९२६)
२२) शिवसंस्मृति, संपादक – (१९२७)
२३) Shivaji Souvenir, संपादक – (१९२७)
२४) मुसलमानी रियासत, भाग १ तृतियावृत्ती – (१९२७)
२५) मुसलमानी रियासत, भाग २ तृतियावृत्ती – (१९२८)
२६) मराठी रियासत, उत्तरविभाग १, १७७४ ते १७८३ – (१९२९)
२७) सरदेसाई घराण्याचा इतिहास, उत्तरार्ध भाग १ – (१९२९)
२८) इंग्लिश भाषेची गृहशिक्षा – (१९२९)
२९) सरदेसाई घराण्याचा इतिहास, उत्तरार्ध भाग २ – (१९२९)
३०) पेशवे दफ्तरातून निवडलेली कागदपत्रे, संपादक, भाग १ ते ४५ – (१९३० ते १९३४)
३१) मराठी रियासत, उत्तरविभाग २, १७८४ ते १७९७ – (१९३०)
३२) शालोपयोगी भारतवर्ष, १८वी आवृत्ती – (१९३१)
३३) मराठी रियासत, उत्तरविभाग ३, १७९५ ते १८१८ – (१९३२)
३४) चित्रमय हिंदी राजवंश – (१९३२)
३५) Main currents of Maratha History, विस्तारित द्वितियावृत्ती (१९३२)
३६) ऐतिहासिक पत्रव्यवहार, सहसंपादक – (१९३३)
३७) Hand book to the records in the Alienation Office  – (१९३३)
३८) श्यामकांतची पत्र – (१९३४)
३९) बालोपयोगी महाराष्ट्राचा इतिहास, सुधारीत नवी आवृत्ती – (१९३५)
४०) राजा शहाजी, मराठी रियासत – (१९३५)
४१) शककर्ता शिवाजी, मराठी रियासत – (१९३५)
४२) उग्रप्रकृती संभाजी, मराठी रियासत – (१९३५)
४३) अव्वल मराठेशाहीचे अंतःस्वरुप, व्याख्याने – (१९३६)
४४) स्थिरबुद्धी राजाराम, मराठी रियासत – (१९३६)
४५) Poona Affairs, residency correspondence, Malet’s embassy – (१९३६)
४६) हिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास – (१९३७)
४७) ब्रिटिश रियासत, उत्तरार्ध – (१९३८)
४८) महादजी शिंदे यांची पत्रे – (१९३८)
४९) ऐतिहासिक पत्रबोध – (१९३९)